उस्मानाबाद -: आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात सर्व यंत्रणांनी भूमिका बजावावी. यामध्ये कोणतीही हगगय होणार नाही, याकडे लक्ष दयावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख  जे.टी. पाटील यांनी दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सर्व कक्ष प्रमुख तसेच निवडणूक खर्च विषयक यंत्रणांची बैठक श्री. पाटील यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, कोषागार अधिकारी तथा खर्च संनियंत्रण कक्ष प्रमुख राहूल कदम, उप विभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी श्री. पाटील यांनी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक, लेखा पथक, सहायक खर्च निरीक्षक, माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समिती  यांनी त्यांचे काम अतिशय काटेकारेपणे करणे आवश्यक आहे. दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होण्याबाबतची कार्यवाही प्रत्येक यंत्रणांनी करावी,असे त्यांनी नमूद केले.
    यावेळी खर्च संनियंत्रण कक्षाचे प्रमुख श्री. कदम यांनी सर्व यंत्रणांनी त्यांचे अहवाल वेळेत आणि वस्तुनिष्ठपणे पाठविण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. यावेळी विविध पथकांनी कोणत्या प्रकारच्या खर्चाचे अहवाल देणे आवश्यक आहे, याची माहिती त्यांनी दिली.          
 
Top