पांगरी (गणेश गोडसे) :- शेतक-यांच्या शेतातील द्राक्ष खरेदीचा ठराव करून द्राक्षे तोडुन नेऊन विक्री करून बाकी रक्कम न देता पळुन जावुन व्यापा-यांनी शेतक-यांची चार लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना पांगरी (ता. बार्शी) येथे घडला असुन द्राक्ष ऊत्पादकांची फसवणुक केल्याप्रकरणाचा पहिला गुन्हा शुक्रवारी रात्री पांगरी पोलिसात नोंदवण्‍यात आला आहे.
    धोडिंराम अंकुश बिराजदार (रा.वाशीम, मुंबई) व ओमवीर (रा.सुरत, गुजरात) अशी शेतक-यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यापा-यांची नांवे आहेत. संतोष पंडित नाईकवाडी (वय 32, रा. पांगरी, ता. बार्शी) या शेतक-यांने फसवणुक झाल्यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे.
   संतोष नाईकवाडी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि. 12 मार्च रोजी आरोपी धोंडिराम बिराजदार व ओमविर यांनी फिर्यादिच्या पांगरी हद्दीत असलेल्या गट नंबर 590 मधील द्राक्षे खरेदी करून तोडणी करून बाजारपेठेत घेऊन गेले. द्राक्षे घेऊन जावुनही फिर्यादीसह इतर शेतक-यांना पैसै दिले नाहीत. पैसै न देताच व्यापारी निघुन गेले. संतोष नाईकवाडी यांच्या फिर्यादिवरून परराज्यातील व्यापा-यांविरूदध शेतक-यांची फसवणुक केल्याप्रकरणी पांगरी पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पांगरी पोलिसात फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला असला तरी राज्यात त्याच व्यापा-यांविरूदध गुन्हे दाखल होण्‍याची शक्यता आहे. आरोपींचा शोध घेऊन शेतक-यांना न्याय मिळावा व शेतक-यांना लुबडणारी टोळी उजेडात आणावी अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे.
 
Top