पांगरी (गणेश गोडसे) :- छेड काढण्याच्या व जाब विचारण्याच्या कारणावरून दोन गटात काठीने तुफान हाणामारी होऊन झालेल्या मारहाणीत दोन्ही गटातील सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 15 मार्च रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास खडकोणी (ता. बार्शी) येथील किराणा दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादिवरून दोन्ही गटातील पंधरा जणांविरूध्द मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता संजय बगाडे, संजय काशिनाथ बगाडे, मंगल जयदथ बगाडे, जयदत्त बगाडे व शिवलिंग बगाडे अशी काठीहल्यात गंभिर जखमी झालेल्यांची नावे आहेत. सुनिता संजय बगाडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी मंगल जयदत्त बगाडे, सचिन बगाडे, जयदत्त बगाडे, शिवलिंग बगाडे, स्वप्नील बगाडे, रूंदावती बगाडे, प्रतिक्षा बगाडे यांनी त्यांची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून बेकायदेशीर गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांच्यासह त्यांच्या पतीला काठीने व हाताने लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले.
विरोधी मंगल जयदत्त बगाडे (वय 42) या अंगनवाडी सेविकेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी संजय काशिनाथ बगाडे, सुनिता संजय बगाडे, काशिनाथ विश्वनाथ बगाडे, पदमीन काशिनाथ बगाडे, अजय संजय बगाडे, सुमित संजय बगाडे, राहुल काशिनाथ बगाडे, अश्विनी राहुल बगाडे यांनी छेडछाडीच्या कारणावरून काठीने बेदम मारहान करून जखमी केले. गैरकायद्याची मंडळी जमवुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
परस्परविरोधी फिर्यादिवरून पांगरी पोलिसात दोन्ही गटातील पंधरा जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन अधिक तपास हवालदार भापकर हे करत आहेत.