पांगरी (गणेश गोडसे) :- सालगडयास मारल्याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी मिळुन एकाला काठीने बेदम मारहान करूण गंभीर जखमी केल्याची घटना आज रविवार दि. 16 मार्च रोजी सकाळी वालवड (ता. बार्शी) येथील शिवारात घडली.
    नवनाथ सोपान जाधवर (वय 25, रा.वालवड) असे काठी हल्यातील जखमीचे नांव असुन राजेंद्र भिवा जाधवर, अक्षय शुभाष जाधवर व सुभाष भिवा जाधवर अशी काठीने मारहान करूण जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
   जखमी नवनाथ जाधवर यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सालगडयास मारल्याचा जाब विचारले असता, आरोपींनी त्यांना काठीने डोक्यात मारून जखमी केले व जिवे ठार मारण्‍याची धमकी दिली. पांगरी पोलिसात गुन्हे दाखल करण्‍यात आले असुन अधिक तपास पोलिस करत आहेत.
 
Top