उस्मानाबाद -: उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्याकडून लोकसभा निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणा-या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विधानसभानिहाय आणि तालुकापातळीवर नियुक्त करण्यात आलेले खर्च नियंत्रण पथक अधिक गतीने कार्यान्वित झाले आहे. या पथकातील सदस्यांना जिल्हा खर्च सनियंत्रण कक्ष प्रमुख राहून कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी तपशीलवार प्रशिक्षण दिले आहे.
    उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी प्रचारासाठी केलेला कोणताही खर्च लपवू नये तसेच वस्तूनिष्ठपणे तो खर्च निवडणूक यंत्रणेला कळविला आहे किंवा नाही, याची स्वतंत्रपणे हे पथक देखरेख करणार आहे. त्याअनुषंगाने लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात हे प्रशिक्षण देण्यात आले.
    संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक , सहायक पोलीस निरीक्षक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक व्हीडिओ पाहणी पथक भरारी पथक स्थिर सर्वेक्षण पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.
    उस्मानाबाद येथे स्वत: खर्च सनियंत्रण  कक्ष प्रमुख राहूल कदम यांनी, भूम,औसा, तुळजापूर येथे प्रताप भंडारे आणि आप्पासी पवार यांनी तर उमरगा व बार्शी मतदारसंघ येथे डी.व्ही. सूळ आणि श्री. बोथे यांनी प्रशिक्षण दिले.
    सर्व पथकांची जबाबदारी करावयाची कामे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.        
 
Top