बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सामाजिक बांधिलकी जपत केवळ लोकसेवेसाठीच राजकारणात सदैव सक्रिय राहणार असल्याची ग्वाही आरएसएमउदयोग समुहाचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी देवळालीतील समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना दिली.
    आरएसएमसंस्था आयोजित या स्नेह मेळाव्यात उस्मानाबाद शिवसेना जिल्हा परिषद गटनेते दत्तात्रय साळुंखे, शिवाजीराव पवार, सरपंच बाजीराव तांबे, वैराग शिवसेना शहर प्रमुख संतोष गणेचारी, उपप्रमुख बाळासाहेब पवार आर्वजून उपस्थित होते. मैत्री जपणे हा माझा स्वभाव धर्म आहे. आपले पोट भरल्यानंतर दुसर्‍याचा विचार केला पाहिजे हि संस्कृती जपत मी स्वखर्चाने आरएसएमपरिवारांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या सुखदु:खात कायमसहभागी राहणार असे अभिवचन देत मिरगणे म्हणाले लोकांच्या प्रेमाची सत्ता मला मिळाली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही. विधायक राजकारण करत राहणार. लोकसेवेला प्राधान्य असेल त्यामुळेच उमेदवारी मिळाली नाही तरी अजिबात नाराज न होता नुकताच हजारोंसाठी नेत्रचिकित्सा शिबिर घेतले. भावी काळात समाजसेवा सुरु राहिल. भविष्यात मल्टीस्टेट कोऑपरेटीव्ह बँक,पतसंस्था आणि गरिब गरजूंना सेवा देणारे हॉस्पिटल काढणार आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समस्या निवारण केंद्र काढणार आहे. तालुक्यातील गारपीट ग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांना राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या ट्रस्ट मार्फत मदत मिळवून देण्याचा व हि गावे दत्तक घेण्याचा विचार आहे. राजकारणांमध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे समाजसेवेची इच्छाशक्ती असणार्‍या कर्तबगार कार्यकर्त्यांना भावी काळात निवडणुकांसाठी राजकिय पाठबळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवर पूर्णपणे निष्ठा असून पक्षाच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. केवळ राजकिय इच्छाशक्ती नसल्यामुळे बार्शी उपसासिंचन योजना रेंगाळली शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात मंजुर झालेला हा प्रकल्प पुढे गेला असता तर आज तालुक्यात हरितक्रांती झाली असती आणि पालकमंत्र्याचा कारखाना बंद पडला नसता अशी उपरोधिक टिका यावेळी मिरगणे यांनी केली. यावेळी शिवाजीराव पवार, हरिदास गुरव, सिध्देश्‍वर मुमरे, दत्तात्रय साळुंखे, साबळे यांनीही समयोचित भाषणे केली. यावेळी कळंबचे दिलीप पाटील, राहुल डोके, बिभिषण पाटील, मदन गव्हाणे, किरण गायकवाड, राजाभाऊ मोरे, अजित लाकाळ, अविनाश पोकळे, समाधान पाटील, अविनाश मिरगणे, सारंग गुरव आदी उपस्थित होते.
 
Top