उस्मानाबाद :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीबाबतची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. पहिल्याच दिवशी २८ जणांनी नामनिर्देशनपत्रे नेली, मात्र, एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद किंवा उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद यांचेकडे बुधवार, दि. 26 मार्चपर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात दाखल करता येतील. पहिल्या दिवशी मात्र, एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाने उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांचे नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने २५ हजार रुपये आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने १२ हजार ५०० रुपयांची अनामत रक्कम नामनिर्देशनपत्रासोबत भरणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करावयाचा फॉर्म क्र. 26 मधील शपथपत्रामधील प्रत्येक ओळीत आणि रकान्यामध्ये अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी माहिती निरंक असेल त्या ठिकाणी निरंक अथवा लागू नाही असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. कोणताही रकाना रिकामा ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार व इतर ४ अशा एकूण ५ व्यक्तींनाच फक्त प्रवेश करता येईल. तसेच संबंधितास केवळ जास्तीत जास्त तीन वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणण्यास परवानगी असणार आहे. मान्यता प्राप्त राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी पक्षाचे विहित नमुन्यातील ए आणि बी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिनांकास (दि.26 मार्च, 2014) रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करावयाचा आहे. या फॉर्मवर पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची शाईची सही असणे आवश्यक आहे. फॅक्सद्वारे मागविलेले ए किंवा बी फॉर्म अथवा मूळ ए अथवा बी फॉर्मची झेरॉक्स चालणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मागासवर्गीय उमेदवाराने ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गात असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्राची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त उमेदवाराचे नाव महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात नोंदविले त्या बाबतचा मतदार यादीची प्रमाणित प्रत किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारासाठी 1 प्रस्ताव आणि इतर व्यतिरिक्त उमेदवारासाठी संबंधित लोकसभा मतदारसंघातील 10 प्रस्तावक असणे आवश्यक राहील. नामनिर्देशनपत्रासोबत फॉर्म 26 नमुन्यामधील शपथपत्र शंभर रुपयांच्या बॉन्डवर आयोगाने निहित केलेले सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले मूळ शपथपत्र जोडणे आवश्यक आहे.