उस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून गुजरातचे सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव रमेशकुमार मकाडिया यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने 14 मार्च रोजी याबाबतचे आदेश जारी केले असून जिल्हा निवडणूक विभागाला त्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.एम. मुकणे यांची मकाडिया यांचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.