बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील माहिती पटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ आज सकाळी 9 वाजता उपले दुमाला येथे वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी भरत भाई वखारिया, वखारिया विद्यालायाचे मुख्याध्यापक बुरगुटे, सौ मंजुषा काटकर, जयंत भोसले, उपले दुमाला आदीजण उपस्थित होते.
आम्ही बार्शीकर परिवार या माहितीपटाची निमिर्ती करत असून मामाच्या जीवनातील महत्वाच्या घटना प्रसंग या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणार आहेत अश्या माहितीपटाची निर्मिती करून आम्ही बार्शीकर परिवार बार्शीतील तरुनासमोर एक वेगळा आदर्श ठेवत आहे असे मत भरत भईने व्यक्त केले . माहितीपटाचे यशस्वी चित्रीकरण होण्यासाठी राहुल जगदाळे ,सचिन नलावडे ,सचिन वीर ,प्रशांत शिंदे, स्वप्निल नेवाले ,प्रसाद गुंड जगदीश गुडे ,मयूर जाधव अनिकेत मुड़के हे मनापासून कष्ट घेत आहेत.