बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा बार्शीच्या वतीने होळी व रंगपंचमीनिमित्त हास्यरंगचे आयोजन करण्यात आले आहे. यात खुमासदार किस्से, विनोदी कविता, वात्रटिका, चारोळ्या व नकलांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती म.सा.प.चे शाखाध्यक्ष पां.न.निपाणीकर यांनी दिली.
    रविवारी दि.२३ रोजी सार्वजनिक वाचनालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. का कार्यक्रम नि:शूल्क होत असून साहित्य रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष मुकूंदराज कुलकर्णी, उपाध्यक्षा शारदा पानगावकर, कार्यवाह शब्बीर मुलाणी यांनी केले आहे.
 
Top