उस्मानाबाद :- जिल्ह्यातील माजी  सैनिक / युध्द  विधवा/ माजी सैनिकांच्या विधवा पत्नी/ आजी सैनिकांना सूचित करण्यात येत की, येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया जुन 2014 पासून सुरु होणार आहे. ज्यांना आपल्या पाल्यांस या वसतिगृहात दाखल करावयाचा आहे  त्यांनी आपले अर्ज वसतिगृह अधिक्षक, सैनिक मुलांचे वस्तीगृह,खाजानगर होमगार्ड कार्यालयाच्या बाजुस, उस्मानाबाद येथे सादर करावेत.
    प्रवेशासाठी प्रवेश अर्ज, अटी व इतर माहिती वसतिगृहाच्या प्रवेश माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  भ्रमण क्रमांक 9970856438/ 9890996960 वर संपर्क साधावा,  असेही  प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले  आहे.  
 
Top