पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी जवळील निलकंठेश्वर मंदिरासमोरील नदीवर बांधण्यात आलेल्या पहिल्या बंधा-यामुळे जिल्हयाला कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याची ओळख झाल्याचे सांगत पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जिरवण्यासाठी साखळी पध्दतीच्या बंधा-याला अग्रक्रम दिला जाणार असुन शेतात काम करणा-या तरूणाला आवश्यक बाबींची उपलब्धता करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
पांगरी (ता. बार्शी) येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यात ना. सोपल हे बोलत होते. यावेळी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडे, तालुकाध्यक्ष विजय ठोंगे, मंगल शेळवणे, उषा गरड, मोहन घावटे, वसंत गरड, गणेश जाधव, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, चिंचोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष किरण पवार, कमलाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पांगरीचे माजी सरपंच औदुंबर काकडे, उक्कडगांवचे दिपक मुळे, वसिम पठाण यांनी यावेळी राष्ट्रवादी क्रॉग्रेसमध्ये प्रवेश केला.
ना.सोपल पुढे बोलताना म्हणाले की, गतवर्षी पडलेल्या दुष्काळात एकटया सोलापुर जिल्हयाला कृषी मंत्री शरद पवार यांच्या खात्यातर्फे पावणे पाचशे कोटी रूपयांचे अर्थसहाय्य विविध अनुदानापोटी व योजनांमधुन शेतक-यांना वाटप करण्यात आले आहे. सतरा वर्षापासुन प्रलंबित असलेले अनेक निर्णय आपण पाणीपुरवठा मंत्री झाल्यानंतर घेतल्याचे सांगत पाणीपुरवठा योजनांसाठीच्या अटीतील लोकवाटयाची महत्वाची अट शिथील केल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात बोलताना ना.सोपल म्हणाले की, शासन यावर सकारात्मक निर्णय घेईल. तरूणांसाठी अनेक योजना कार्यरत असुन त्याचा युवकांनी शोध घेण्याची गरज असल्याचे सांगत बार्शी तालुका हा छोटया उदयोगांचे आदर्श मॉडेल ठरत असल्याचे सांगत आपण गवगवा न करता काम करणारा माणुस असल्याचे सांगितले. शेतीसह उदयोगधंदयांना उर्जीतावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असुन कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना संपुर्ण अभ्यासाअंतीच करा असे, त्यांनी उपस्थितांना सांगितले.
प्रास्ताविकात स्वप्नील काळे यांनी आजच्या युवकाला ना.सोपल हे आदर्शवत ठरत असल्याचे सांगुन त्यांनी तरूणांना दिशा देण्याचे काम केल्याचे सांगितले. यायावेळी नंदकुमार काशिद, मंदाताई काळे, औदुंबर शेळके आदींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला बाबा जाधव, संतोष चव्हाण, विक्रांत गरड, तात्या बोधे, धनंजय तौर, सुनिल गाढवे, बापु खबाले, आशपाक शेख, मनोज मोरे, समाधान पोफळे, गोरख चांदणे आदी युवक हजर होते. मेळावा यश्स्वी करण्यासाठी स्वप्नील काळे, किरण गाढवे, विलास जाधव, सनी काकडे, सादिक पठाण, शकिल बागवान, दत्ता पोफळे, निलेश तावसकर, बिभिषण गोडसे यांच्यासह पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.