पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शी तालुक्यात झालेल्या गारपीठ अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन सरसावले असुन तालुक्यात कृषी खाते, तलाठी व ग्रामसेवक यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळावर जावुन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहनी करून पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. प्रशासनाने पंचनाम्यास सुरूवात केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांच्या माना उंचावल्या असुन प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळणार का? मिळाली तर किती मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न नुकसानग्रस्त शेतक-यांना पडले असुन किमान निवडणुका तोंडावर असल्यामुळे तरी शासन प्रशासन कांहीतरी हाती देईल अशी भाबडी आशा शेतकरी बाळगुन आहेत. निवडणुका तोंडावर असुन कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागु होऊन नुकसानग्रस्तांच्या आशेवर विरझन पडु शकते असे बोलले जात आहे.
पांगरीसह बार्शी तालुक्यात नुकतीच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावुन द्राक्षबागा, आंबा, गहु, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांची पुरती वाट लावली होती. अचानक कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता भरडुन निघाला होता. पांगरी, कारी, उक्कडगांव, पाढरी आदी द्राक्षबागेच्या पटयातील शेतक-यांचे तर अक्षरक्षः कोटयावधी रूपयांचे नुकसान होऊन कंबरडेच मोडले होते. द्राक्षबागांच्या घडांचा अक्षरक्ष बागेत खच तयार झाला आहे. प्रशासनाने पंचनाम्यास सूरूवात केले असल्यामुळे चाटुला कुडाचा आधार या म्हणीप्रमाणे काही तरी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शनिवार पासुन पांगरी येथील कृषी खात्याच्या मंडळ अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व ग्रामसेवक गाव कामगार तथा मंडलाधिकारी कार्यालय पांगरीचे अधिकारी यांनी घटनास्थळावर जावुन पाहणी केली. कृषी सहाय्यक आर.एस. देशमुख, ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर, गावकामकार तलाठी राठोड, जाधव यांच्यासह इतर अधिका-यांनी पंचनामे करण्यास सुरूवात केली असुन त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया मार्गी लागणार आहे.