उस्मानाबाद -: निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात 100 मीटरच्या आत उमेदवाराचे छायाचित्र लावणे, तलवारीचा लोगो व जिल्हाध्यक्ष असा मजकूर असणे तसेच पक्षाचे स्टीकर असल्याप्रकरणी आणि वाहन अनधिकृतपणे उभे केल्याप्रकरणी  तीन वाहनांच्या चालकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी व्ही.डी.ओ. पथकाचे प्रमुख सुनिल नाईकवाडी यांनी  फिर्याद दिली होती. दि. 27 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा प्रकार घडल्याचे व्ही.डी.ओ. चित्रीकरण पथकाच्या चित्रीकरणात आढळून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top