उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने ‍नियुक्त करण्यात आलेले निवडणूक‍निरीक्षक  रमेशकुमार मकाडिया यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यम कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यम कक्षाच्या कामकाजाची पाहणी केली. विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरींग, पेडन्यूज आदिंबाबत कक्ष करत असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आचार संहिता कक्ष प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क प्रमुख तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रसारमाध्यम कक्ष प्रमुख अजय चारठाणकर यांनी त्यांचे स्वागत केले.  
 
Top