पांगरी (गणेश गोडसे) :- सुरतेच्या व आग.यांच्या व्यापा.यांनी महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांची लुट केल्याचा खळबळजनक प्रकार बार्शी तालुक्यात उघडकीस आला आहे.
    गारपीठीच्या तडाक्यातुन कसबसा उभारी घेण्‍याच्या प्रयत्नात असलेल्या बार्शी तालुक्यासह शेजारील कळंब, भुम, वाशी आदीं तालुक्यांसह राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांना द्राक्ष व्यापा-यांच्या बाहेरराज्यांमधील लुटारूंच्या आंतरराज्य टोळीने लाखो रूपयांना गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे. प्राप्त माहितीनुसार व टोळीतील एकाने दिलेल्या माहितीवरून नाशिक, सोलापुर, उस्मानाबाद, बारामती जिल्हयांमधील शेतक-यांना लाखो रूपयांना गंडवण्‍यात आले असले तरी नेमके किती शेतक-यांना चुना लावण्‍यात व्यापारी यशस्वी झालेत याचा अद्याप अंदाज लागलेला नाही. फसवणुक झालेल्या शेतक-यांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कांही शेतक-यांनी आपल्या झालेल्या फसवणुकीबाबत पांगरी ता.बार्शी पोलिसात धाव घेतली आहे.
    एकंदर मात्र निसर्गाच्या दृष्टचक्राचा बळी ठरलेला शेतकरी व्यापा-यांनी घातलेल्या गंडयामुळे पुरता नागावला गेला असुन हा शेतकरी पुर्णतः तणावाखाली दिसत असुन याचा वेळीच छडा न लागल्यास अनुचित घटना घडण्‍याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतक-यांना फसवणा-या आंतरराज्य टोळीचा शोध तातडीने घेणे गरजेचे आहे. अगोदर निसर्गाने व तदनंतर उरलेसुरले माणुस नावाच्या चतुर व्यापा-यांनी द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या पाठिमागे लागुन त्याला पुरते चक्रव्युहात टाकले असुन फसवणुक झालेल्या शेतक-यांची तर मतीच गुंग झाली आहे. सलग तिन वर्ष भिषण दुष्काळ त्यात रक्ताचे पाणी करून व लाखो रूपये कशा बशा जगवलेल्या द्राक्ष बागा. तशातच अवकाळी पाऊस, अभुतपुर्व गारपीठ आदी संकटांमधुन सावरून उरले सुरलेले द्राक्ष व्यापा-यांना विकुन औषध पाण्‍याचा तरी खर्च काढण्‍याच्या प्रयत्नात असलेल्या बार्शी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या पदरी व्यापारी द्राक्षे घेऊन पैसै न देता पळुन गेल्यामुळे घोर निराशा पडली असुन आता पुढे काय हा मोठा प्रश्‍न ऊत्पादकांसमोर उभा राहीला आहे. द्राक्ष ऊत्पादकांवर आलेल्या नैसर्गिक संकटाचा चांगलाच फायदा व्यापा-यांनी उठवल्याचे उघड झाले आहे.
     याबाबत शेतक-यांकडुन प्राप्त माहिती अशी की, बार्शी तालुक्यात पांगरी भागात द्राक्ष बागांचे मोठे क्षेत्र असुन गत महिन्यात सगळीकडेच झालेल्या गारपीठ व अवकाळी पावसामुळे या भागातील द्राक्षबागांचे खुप मोठे नुकसान झाले होते. साधारणतः 80 टक्केच्या आसपास बागा गारपीठीच्या तडाख्यात सापडुन या परिसरातील शेतकरी उध्वस्त झाला होता. मात्र तेवढयातुनही कांही शेतक-यांच्या बागांनी तग धरला होता. अशा सुस्थितीतील द्राक्ष बागा परराज्यातील कांही व्यापा-यांनी महाराष्‍ट्रातील कांही दलालांकरवी खरेदी करून माल परराज्यात पाठवला होता. पांगरी येथील पंडीत नाईकवाडी, लक्ष्मण बनसोडे, उक्कडगांव येथील नानाप्पा मुंढे, तसेच खानापुर ता.वाशी जि.उस्मानाबाद येथील धर्मराज भास्कर शिंदे, जामगांव येथील पठाण या शेतक-यांसह बार्शी तालुक्यातील इतर अनेक शेतकरी व शेजारील उस्मानाबाद व नाशिक जिल्हयातील शेतक-यांचीही लाखो रूपयांची फसवणुक झाल्याच्या घटना उजेडात येत आहेत़.
    नाशिक जिल्हयात याच पदधतीने व हयाच व्यापा-यांच्या टोळीने द्राक्ष उत्पादक शेतक-यांची फसवणुक केल्याच्या घटना उजेडात येत आहेत. डिसेंबर अखेरीस द्राक्षबागांचे आगार असलेल्या नाशिक जिल्हयात याच सुरतेच्या लुटारूंनी तेथील शेतक-यांची दिशाभुल करत तेथील माल सुरतेच्या बाजारपेठेत नेऊन विकला होता व गडगंज नफ्यासह गरीब द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे मुद्दलही लंपास केले होते. नाशिक जिल्हयातील अनेक शेतक-यांना चुना लावुन आपली तुंबडी भरल्यानंतरही त्यांची शेतक-यांना लुबाडण्‍याची इच्छापुर्ती न झाल्यामुळे त्या लुटारूच्या टोळीने आपला मोर्चा गारपीठीत नेस्तनाबुत झालेल्या सोलापुर, उस्मानाबाद जिल्हयांकडे वळवळत लातुर स्थित असलेल्या व सध्या मुंबईत व्यापार करत असलेल्या एका आडत्यामार्फत द्राक्ष व्यापार सुरू केला. उस्मानाबाद जिल्हयातील भुम या तालुक्याच्या ठिकाणी या ठकांनी आपले केंद्र केले होते. तेथुनच दोन जिल्हयांमधील द्राक्ष उत्पादकांना फसवण्‍याचे नियोजन आखण्‍यात येत असे. शेतक-यांचा विश्‍वास संपादन करण्‍यासाठी सुरतेच्या लुटारूंनी मुंबईतील स्थानिक सहका-यांच्या नावाने बँकेत असलेल्या खात्याचा धनादेशही शेतक-यांना दिले. अविश्‍वास वाटु नये, म्हणुन कांही शेतक-यांना वरचेवर थोडया-थोडया रकमाही व्यापारी देत गेले. शेतकरी त्यामुळे आपले पैसै मिळतील या आशेने आपल्या मोबाईलकडे म्हणजे बँकेच्या एस.एम.एस कडे डोळे लावुन बसायचे. मात्र जस जसे दिवस जात होते तस तसे व्यापा-यांच्या भ्रमनध्वनीची टिक टिक कमी कमी होत गेली व आज अखेर व्यापा-यांच्या टोळीने व मध्यस्थांनी आपले भ्रमनध्वनीच नॉट रिचेबल करून ठेवले आहेत. लाखो रूपयांना अडकलेल्या शेतक-यांचे त्यामुळे धाबे दणाणले असुन सुदैवाने थोडेफार का असेना मिळाले पण नियतीला ते अमान्य असल्यामुळे व्यापा-यांनी घेऊन गेले अशीच काय ती अवस्था या शेतकयांची होऊन बसली आहे.
    आग-यांच्या लुटारूंचे बार्शी तालुक्यात आगमन व लुट :
महाराष्ट्रात झालेल्या गारपीठीमुळे बहुतांश बागा हया निसर्गापुढे हतबल होऊन द्राक्षविरहीत झाल्या होत्या. मात्र त्यातुनही वाचलेल्या बागा हेरत या ठकांनी त्या शेतक-यांशी संधान साधत माल उचलले. या भागातील शेतक-यांनाही अवकाळीचा फटका बसल्यामुळे व निसर्गातील वातावरण बदलत असल्यामुळे कसेही करून बागांच्या बाहेर द्राक्ष काढायचे असल्यामुळे त्यांनीही डोळे झाकुन व अंध विश्‍वास ठेऊन स्वतः होऊन वर्षभर सांभाळलेला माल आपल्या कॅरेटसह व्यापा-यांच्या हवाली केला.
 
Top