पांगरी (गणेश गोडसे) :- भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकने ओमिनीला पाठिमागुन जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ओमिनीमधील सात भाविक गंभीर जखमी होऊन गाडीचे लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी पुणे-लातुर राज्यमार्गावर कुसळंब ते पुरी गावादरम्यान असलेल्या साई मंदिराजवळ घडली. जखमींमध्ये कळंब तालुक्यातील मोहा गावातील भाविकांचा समावेश आहे.
    शामल सतिश नागटिळक (वय 30, रा.मोहा, ता.कळंब), उर्मिला राहुल पांचाळ (वय 19, रा.खामसवाडी), मिराबाई दत्तात्रय पांचाळ (वय 38, रा.खामसवाडी), वैष्णवी रूषीकेश पांचाळ (वय 5 वर्ष), राहुल दत्तात्रय पांचाळ (वय 24) अशाबाई लक्ष्मण गाढवे (वय 25 रा.पांगरी ता.बार्शी) व रंगनाथ किसन पांचाळ (रा.खामसवाडी) अशी अपघातातील जखमींची नांवे असुन यापैकी चौघांची प्रकृत्ती गंभिर आहे.
  सतिश भिमराव नागटिळक (रा.मोहा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की,  भाविक हे कुसळंब येथील दत्त देवस्थान येथील देवदर्शनाचा कार्यक्रम आटोपुन पांगरी मार्गे मोहा गावाकडे ओमिनी क्रमांक एम.एच.12 इजी.477 मधुन जात असताना पाठिमागुन लातुरकडे भरधाव वेगात निघालेल्या मालट्रक कमांक एम.एच.23डब्लु 1577 च्या चालकाने गाडीला पाठिमागुन जोरदार धडक दिली. अपघातात ओमिनीचा पाठिमागील भागाचा चैन्दामेंदा झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पाठिमागे वळुन पोबारा केला. सतिश नागटिळक यांच्या फिर्यादिवरून अनोळखी ट्रकचालकाविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. जखमींवर बार्शीच्या जगदाळेमामा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अधिक तपास हवालदार बिराजदार हे करत आहेत.
 
Top