पांगरी (गणेश गोडसे) : बार्शी तालुक्यांसह महाराष्ट्रातील द्राक्ष, आंबा, दाळींब, कांदा, चिकु आदी उत्पादक शेतक-यांना फसवुन त्यांचे आर्थिक शोषण करण्‍याची ही पहिलीच घटना नसुन कांही दिवस विसराळी पडल्यानंतर चेहरे बदलुन पुन्हा तेच लुटारू येऊन पिचलेल्या शेतक-यांना पुन्हा कंगाल करून जात आहेत. त्याच तिकिटावर तेच पिक्चर या म्हणीप्रमाणेच व्यापारी पहिले चेहरे लपवुन नविन चेह-यांने या भागात येऊन शेतक-यांना लुटुन नेण्‍यात धन्यता मानतात. यावर्षी गारपीठीने निम्याच्या पुढे नुकसान केले होते तर राहीलेले सर्व या व्यापा-यांनी खरडुनच घेऊन गेले. फसवणुकीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना पुन्हा उभारी घेऊन नव्या उमेदीने उभे रहावे लागणार असुन मात्र अशा परिस्थतीत तो पुन्हा उभा राहील का हा मोठा प्रश्‍न आहे.
    पंधरा वर्षांपुर्वी पांगरीजवळील कारी, नारी, धनगरवाडी, कुसळंब आदी गावांमधील शेतक-यांना अशाच पध्‍दतीने उत्तरप्रदेश राज्यातील व्यापा-यांनी टोपी घातली होती. तेव्हाच्या काळात कारी गावातील एका मोठया शेतक-यांना चाळीस लाख रूपयांना टोपी घातली होती. या झटक्यातुन तो शेतकरी आज पंधरा वर्षानंतरही चांगल्या पध्‍दतीने सावरू शकलेला नाही. ऐन उमेदीच्या काळात अशा परिस्थतीतुन गेल्यास काय अवस्था होते, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणुन सध्या पाहिले जात आहे. 'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये' अशीच कांहीशी अवस्था लुटारू व्यापा-यांनी द्राक्ष उत्पादक शेतक-यांची केली आहे. शेतक-यांचा विश्‍वास संपादन करण्‍यासाठी त्यांना देण्यात येणारे व्हीजिटिंग कार्डसुध्‍दा बनावट निघत आहेत. यापुर्वी फसवणुक झालेल्या शेतक-यांना याचा चांगलाच अनुभव आला आहे.
   ठाव ठिकाणा काढल्यास धमक्या, दाद ना फिर्याद :
अपवादात्मक वेळेस व्यापा-यांनी शेतक-यांना दिलेले संपर्काचे पत्ते बरोबर निघाले व उत्पादक शेतकरी त्यांच्या ठावठिकाण्‍यावर पोचला तर त्यांना पुन्हा पैशासाठी येथे न येण्‍याच्या व परत आल्यास जिवे ठार मारून प्रेताचीही विल्हेवाट लावण्‍याच्या धमक्या समोरासमोर दिल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. शेतक-यांच्या शेतात आल्यानंतर व थोडेशे पोटात शिरून विश्‍वास संपादन करताच लगेच फाशी पडणारा अशी कांहीशी शेतक-यांची ओळख आहे. द्राक्ष बागा घेण्‍यासाठी शेतात आल्यानंतर आलेली भाषा व पुन्हा व्यापारी त्यांच्या व्‍यावसायाच्या गावात गेल्यानंतरची भाषा यातच खुपच मोठा बदल घडुन येतो. भित्रा शेतकरी मात्र माणसांच्या जंगलात दिलेल्या धमकीला भिऊन आपले गांव गाढतो व झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणुन पुन्हा पहिल्यापासुन सुरूवात करतो. यापुर्वी अशीच फसवणुक झालेला शेतकरी व्यापा-यांचा शोध घेऊन त्यांच्या दुकानी गेला होता मात्र तेथे पैसे व ओळख न मिळता धमक्या घेऊन तो परत आला होता. त्यामुळे सध्या फसवणुक झालेल्या शेतक-यांना कोणत्या प्रकारांना सामोरे जावे लागणार हे येणारा काळच सांगेल.
    सगळीकडे फसवणुक, लुबाडणूक या गोष्‍टी गाजत असतानाच शेतकरी मात्र या गोष्‍टीत जास्त भरडला जात आहे. कोणत्याही घटनेचा सर्वाधिक फटका हा शेतक-यांना बसतो. नुकतीच गारपीठ झाली. त्यातुन उठुन बसण्‍याचा प्रयत्न करत असलेल्या शेतक-यांना पुन्हा व्यापा-यांनी फसवुन त्यांच्याकडे होत नव्हते ते लुबाडुन नेले. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत असलेल्या व दर नसल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतक-यांवरच पुन्हा नेम साधला जात आहे. कोणते पाप केले व आम्ही शेतकरी झालेत असे शेतक-यांमधुन बोलले जावु लागले असुन जगाचा पोशिंदा ही बिरू दावली. मात्र आम्हाला देऊन शासन प्रशासन बाजुला रहात आहे.
   राजकारणी मात्र शांत :
तालुक्यातील अवकाळीच्या झटक्यातील शेतकरी पुन्हा व्यापा-यांनी दाखवलेल्या ठेंग्यामुळे पुरता हताश झालेला असताना राजकारणी मात्र फक्त राजकारण खेळण्‍यात गुंग आहेत. काय चालले, काय झाले, कोणाचे झाले, याबाबात कोणालाही कांही वाटताना दिसुन येत नसल्याचे शेतक-यांमधुन बोलले जात आहे.
 
Top