उस्मानाबाद -: लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असताना उस्मानाबाद बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर राजकीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक आढळून आल्याने आचारसंहिता भंग प्रकरणी उस्मानाबाद बस डेपोच्या आगारप्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    याप्रकरणी  ‍व्हीडीओ  सर्वेक्षण पथक, उस्मानाबादचे प्रमुख सुनिल नाईकवाडी यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
    आचारसंहिता अंमलबजावणी पथक हे उस्मानाबाद बसस्थानकाची पाहणी करत असताना प्लॅटफॉर्म नं. 7 वर महात्मा ज्योतिबा फुले अभियान योजनेच्या फलकावर राजकीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक आढळुन आले होते. 
 
Top