बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सविस्‍तर चर्चा करण्‍यासाठी शिवसेना जिल्‍हाध्‍यक्ष लक्ष्‍मीकांत ठोंगेपाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्‍यासह पदाधिकारी मातोश्री येथे बारा वाजता मातोश्री येथे गेले आहेत.
    शिवसेनची जागा कोणाला याबाबत बरीच खलबते झाल्‍यानंतर पक्षश्रेष्‍ठी निर्णयाला पोहोचले. पहिली फळी, दुसरी फळी पासून शिवसैनिकांची शेवटची फळीपर्यंत अनेक दिवसांपासून चर्चासत्र सुरु होते. कोणी काय मिळविले, कोणी काय केले, कोणी काय करायला हवे याच्‍याच चर्चा मोठ्याप्रमाणात रंगत होत्‍या.
    शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांनी केलेल्‍या सूचनेनुसार शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रपणे निर्णय घेण्‍यासाठी बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. सदरच्‍या बैठकीनंतर महत्‍त्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात येणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्षाच्‍या धोरणात्‍मक निर्णयानुसार पुढील कार्याची दिशा ठरणार आहे. यावेळी प्रत्‍येकाच्‍या जबाबदारीची निश्चिती, रणनिती ठरविण्‍यासाठी बैठक होईल. यावेही संपूर्ण मतदारसंघाचा ताळेबंद व आलेख सविस्‍तरपणे मांडण्‍यात येईल. कोणत्‍याही क्षणी निवडणुका घेतल्‍या तरी शिवसेना त्‍याला खंबीरपणे सामोरे जाईल, इतकी तयारी मागील अनेक महिन्‍यांपासून करण्‍यात आली आहे. वेळोवेळी बुथप्रमुखांच्‍या बैठका, शाखा प्रमुखांच्‍या बैठका घेऊन मोर्चे बांधणी करण्‍यात आली आहे.
 
Top