राजेंद्र राऊत
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अपक्ष उभे रहावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला असल्याने बार्शीकरांचा उमेदवार म्हणून राजेंद्र राऊत यांनी कंबर कसली आहे. दरम्‍यान, याबाबत राजेंद्र राऊत यांच्‍याशी संपर्क साधले असता, या वृत्‍तास त्‍यांनी दुजोरा दिला.
     लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटवाटपातील कारभार, राष्ट्रवादीचा भ्रष्टाचारी व्यवहार, भाजपा-सेनेचा उमेदवारीतील गोंधळ यामुळे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार, चांगला पर्याय, सर्वसमावेशक, अभ्यासू, विकासात्मक दृष्टी असलेला उमेदवार म्हणून राऊत यांना पर्याय राहणार नाही. डॉ.पद्सिंह पाटील यांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस केल्यावर अनेक प्रकारचे त्रास दिले जातात त्यामुळे मतदारसंघातील वातावरण तणावाचे आहे. मागच्या वेळी पाटील यांचे सीट धोक्यात आल्यावर व जवळजवळ डॉ.पाटील यांचा पराभव निश्‍चित असतांना केवळ राजेंद्र राऊत यांच्यामुळे विजयाची माळ गळ्यात पडलेल्या खा.पाटील यांनी जनतेच्या विविध कामांना पाठ दाखविली, कोणत्याही कामावेळी सूडाचे राजकारण करणार्‍यांना साथ दिल्या त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत पाटील यांना आपण राजकिय मदत करणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. आता कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे राऊत यांनी लोकसभेला उभे राहण्यास दिलेल्या होकारामुळे बार्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top