पांगरी (गणेश गोडसे) -: शिविगाळ केल्याचा दुरध्वनीवरून जाब विचारल्याचा राग मनात धरून दोघांनी मिळुन दोघांना लोखंडी सळई व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कारी (ता. बार्शी) येथे फिर्यादिच्या घरासमोर घडली.
    प्रकाश रमेश डोके व आकाश डोके (दोघेही रा. कारी, ता. बार्शी) अशी सळई व दगड हल्यातील जखमींची नांवे असुन आबासाहेब छगन विधाते व छगन विधाते अशी लोखंडी सळई व दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
      जखमी प्रकाश रमेश डोके (वय 38, रा. कारी, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांचा मुलगा आकाश यांने त्याच्या आईस आरोपींनी शिविगाळ का केली असे भ्रमणध्वनीवरून विचारले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यासह त्याच्या मुलाला घरासमोर गाठुन संगनमत करून शिवीगाळ करून मारहाण केली. प्रकाश डोके यांच्या फिर्यादिवरूण दोघांविरूदध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार शिवानंद मोसलगी हे करत आहेत.
 
Top