सोलापूर :- निवडणूक काळात काही गैरप्रकाराच्या घटना घडल्यानंतर त्याबाबत कारवाई करण्यापेक्षा अशा घटना घडू नयेत, यासाठी आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन काहीही गैरप्रकार होवू नये यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन 42- सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरिक्षक एच.के. चौधरी यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात निवडणूक खर्चाबाबत संबंधित अधिका-यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी श्री. चौधरी यांनी निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या तपशिलाबाबतची सविस्तर माहिती दिली. यामध्ये कोणता खर्च पक्षाच्या नावांवर व कोणता खर्च उमेदवाराचा कसा धरावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी लेखा पथक, भरारी पथक यांनी माहिती कोणत्या फॉर्ममध्ये कशी देण्यात यावी याबाबतच्या सूचना श्री. चौधरी यांनी दिल्या.
तसेच जाहिरातीचा खर्च, प्रसिध्दी साहित्य छपाईचा खर्च याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागाने सतर्क राहावे. त्याचप्रमाणे बँक अधिका-यांना विविध बँकांतील व्यवहाराबाबत नोंदीविषयी सविस्तर सूचना दिल्या.
यावेळी विविध अधिका-यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले तसेच अडचणी जाणून घेवून मार्गदर्शन केले.
या बैठकीला संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्जेराव मोहिते, रविंद्र कुलकर्णी, शहाजी पवार, एम.बी.बोरकर, श्रीमंत पाटोळे, संजय तेली, खर्च विषयक समितीचे प्रमुख संजय अनपट, बी.एम.पाटील, अजय पवार, अजित शिंदे तसेच स्थिर सनियंत्रण पथक, भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.