सोलापूर :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्याबाबत पात्रउमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आले असून दिनांक 19 ते 28 मार्च 2014 या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे.         
      कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एन्ट्री द्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणा-यांना या परिक्षेची मुलाखत पत्रे पाठविली आहेत. या उमेदवारांना सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्वतयारीकरीता राज्य शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसुल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात येते.  कालावधीत प्रशिक्षणार्थींची निवासाची व प्रशिक्षणाची मोफत सोय असून भोजनासाठी उमेदवाराला प्रति दिवस अतिरिक्त 54 रुपये शुल्क द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी पात्र व इच्‍छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय (दूरध्वनी क्र. 0217- 2731035) या क्रमांकावर संपर्क साधावा. येताना सोबत शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे. एसएसबी प्रवेश वर्गासाठी लागणारी पात्रता व नियम  यांची माहिती या कार्यालयात मिळेल. या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी केले आहे.
 
Top