मुंबई -: छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारुन घराघरात पोहचलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्‍हे यांनी शिवजयंतीच्‍या मुहुर्तावर आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचं शिवसेनेत स्वागत केले आहे. 
         प्रवेश करतेवेळी डॉ. कोल्‍हे म्‍हणाले की, मी महाराष्‍ट्राची वाट लावणा-या सोबत नाही तर वाट दाखवणा-या सोबत जाण्‍यात निर्णय घेतला आहे. नेतृत्‍व आक्रमतेसोबत संयमीही असायला हवं. मला शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ओळख मिळाली आणि त्याच शिवरायांच्या विचाराचं बोट धरुन चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना, अशी प्रतिक्रिया डॉ. अमोल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली. तसेच मावळमधून निवडणुकीसाठी मनसेची ऑफर होती. मात्र आपण ती नाकारली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 
Top