कळंब : येथील शासकीय गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ८ हजार ५०० रुपयाचे धान्य लंपास केल्‍याची घटना सोमवार रोजी रात्री साडे बारा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.   
     कळंब येथील येरमाळा रोडवरील शासकीय गोदामातून तालुक्यातील १४० स्वस्त धान्य दुकानदारांचे स्वस्त धान्य साठवून पुरवठा केला जातो. सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे मागील सेटर उचकवून २४० क्विंटल गहू (१ लाख ६८ हजार ६२४ रु.चा माल) तर १४५ क्विंटल तांदूळ असा एकूण ३ लाख आठ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला आहे. याप्रकरणी कळंबच्या तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top