बार्शी -: उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.पद्मसिंह पाटील यांचा बार्शी विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ आगळगाव (ता.बार्शी) येथून होत आहे. शनिवार दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम होत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य पोपटराव डमरे यांनी दिली.
    या कार्यक्रमासाठी डॉ.पद्मसिंह पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह हे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजनकांनी केले आहे.
 
Top