सोलापूर -: निवडणूक आयोग नवी दिल्ली, सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2014 अन्वये 42 सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी एस. के. चौधरी व 43 - माढा लोकसभा मतदार संघासाठी कमल खन्ना यांची खर्च निरिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे.
    एस. के. चौधरी यांचा भ्रमणध्वनी क्र. 8975951680 हा असुन त्यांचे राहण्याचे ठिकाण शासकीय विश्रामगृह सोलापूर येथील चित्रा कक्षात तर   कमल खन्ना यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8975209793 हा असुन त्यांच्या निवासाचे कक्ष स्वाती शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चा संदर्भात काही तक्रार असल्यास संबधितांनी वरील ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top