जळकोट (संजय रेणुके) -: मुलीचा कौटुंबिक कलह मिटवण्‍यासाठी नंदगाव येथून टमटमने तुळजापूर येथे जात असताना हंगरगा नळ (ता. तुळजापूर) येथे उतारास चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने हंगरग्‍याजवळील पुलाजवळ टमटम पलटी होऊन झालेल्‍या अपघातात एकजण जागीच ठार तर आठजण जखमी झाल्‍याची घटना घडली.
       मस्‍सा सिद्राम चौघुले (वय 60 वर्षे, रा. तुळजापूर) असे अपघात मरण पावलेल्‍याचे नाव असून रामचंद्र केशव नागिले (वय 43, रा. अणदूर, ता. तुळजापूर), शरणाप्‍पा आनंद कांबळे (वय 25, रा. नंदगाव, ता. तुळजापूर), सिद्राम नरसाप्‍पा कुंभार (वय 65, रा. जळकोट, ता. तुळजापूर), तुळशीराम वीरप्‍पा वाघमारे (वय 50, रा. चिवरी उमरगा, ता. तुळजापूर), हणमंत सिद्राम चौघुले (वय 50), अनिल हणमंत चौघुले (वय 35), रुक्‍मीणबाई पवार (वय 45) तिघे रा. तुळजापूर, शंकर भैरु साळे (वय 35, रा. उमरड, ता. करमाळा) असे अपघातातील जखमींचे नावे आहेत.
     प्राथमिक आरोग्‍य केंद्र जळकोट येथे वैद्यकीय अधिकारी निलंगेकर यांनी प्राथमिक उपचार करुन काहींना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवले आहेत. तर काहींना घरी पाठविण्‍यात आल्‍याचे   सां‍गिलले. घटनास्‍थळी नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्ष ए.वाय. डांगे, पो.ना. सुतार, सलीम शेख, राजू चव्‍हाण, संजय जाधव आदींनी प्रत्‍यक्ष जखमींना मदत केली. शंकर भैरु साळे यांच्‍या फिर्यादीवरुन गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून पुढील तपास सपा‍ेनि डांगे हे करीत आहेत.  
 
Top