उस्मानाबाद :- जागरुक नागरिक होऊ या, अभिमानाने मत देऊ या अशा घोषणा देत आज शहरात विविध शाळांनी मतदार जागृती रॅली काढली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून या रॅलीचा शुभारंभ केला. भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप-2 (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा कार्यक्रम राबविला जात आहे.
मतदानाविषयी जागरुकता वाढावी आणि प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके आदिसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी या रॅलीमध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय, समता माध्यमिक विद्यालय, आर्य चाणक्य, शरद पवार हायस्कुल, श्रीपतराव भोसले हायस्कुल, भारत विद्यालय, शम्स उल उलुम, धाराशिव प्रशाला, छत्रपती शिवाजी हायस्कुल आदि शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये मतदान श्रेष्ठ दान, मतदान माझा हक्क तो मी बजावणार, आपले मत आपली ताकद, अशा अनेक घोषणांनी आसमंत दुमदूमन गेला होता. सर्व विद्यार्थी त्यांच्या शाळेय गणवेशात या रॅलात सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, एस. टी. स्टॅन्ड, शिवाजी पुतळा मार्ग शहरातील विविध मार्गाने पुन्हा संबंधित शाळा, महाविद्यालयाकडे मार्गस्थ होऊन तेथे तिचा समारोप झाला.