उस्मानाबाद :- लोकसभा निवडणूकीच्या तारखा दि. 5 मार्च रोजी जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. म्हणून प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात राजकीय बॅनर, पोस्टर्स काढून घेण्याबाबत आदेशित केले असून या बाबतीतील अहवाल संबंधितांनी सोमवारपर्यंत सादर करावेत. ज्यांचे पोस्टर्स,, बॅनर्स आढळून येतील, त्या संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूकविषयक सनियंत्रण कक्ष प्रमुख जे. टी. पाटील यांनी दिले आहेत.
नगरपालिका हदृीत कोठेही राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर्स लावलेले नसावेत तसेच वाहनांच्या ताफ्यात 10 च्या पुढे वाहनाची संख्या असता कामा नये. लाऊडस्पीकर वापरासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून प्रचारादरम्यान विविध घडामोडींचे रेकॉडिंग करणे आवश्यक आहे.
आपण शासकीय कामासाठी दौऱ्यावर असताना आचारसंहितेला बाधा आणणारे कांही आढळले तर तात्काळ संबंधित अधिका-यांना कळवावे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडु नये असे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांचेसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.