बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील जयशिवराय प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील शिवकार्य करणार्‍या व्यक्तिंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी गडकोट किल्ल्यांच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा घेत कसे जगावे या विषयावर व्याखान देण्यात आले.
    प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दि.२ रोजी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे डॉ.बी.वाय. यादव, पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, ऍड्.प्रणाली शेटे, ऍड्.राजश्री डमरे, युवराज जगताप, रवि फौंडेशनचे मधुकर डोईफोडे, प्राचार्य मधुकर फरताडे आदी उपस्थित होते.
        पुरस्कारामध्ये कामगार नेते तानाजी ठोंबरे, संजय देवगुंडे, कराड येथील राजाराम माने यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना विजय राऊत म्हणाले, शिवजयंतीच्या खर्चातील २५ टक्के रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि गडकोट किल्लयांच्या संवर्धनासाठी खर्च करावी, त्याची सुरुवात बार्शीपासून करण्यासाठी प्रयत्न करु. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजन ठक्कर, प्रितेश गांधी, सचिन ललवाणी, राहूल कुंकूलोळ, किरण राऊत, राजेश राऊत, राहूल आगावणे, अनिल शेलार, कुशल वाई, आदित्य सरवदे, सोमनाथ सेवकर, पप्पू बागल, अमोल वाणी, दिनेश घोलप, बालाजी नलावडे, उपाध्यक्ष सुमित नागटिळक, सचिन वाणी, सागर कळसाईत, संतोष वडेकर, अजिंक्य राऊत, किरण नान्नजकर, विलास काटे यांनी परिश्रम घेतले, वसीम शेख यांनी सूत्रसंचलन केले.
 
Top