बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महिला व बालकल्याण विभाग, सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना, विभागाकडून महिला बचत गट व स्वयंरोजगार लाभार्थ्यांकरिता बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून निधींची उपलब्धता करुन धनादेशाचे वितरण करण्यात आले.
    बार्शी नगरपरिषदेच्या कै.जगदाळे मामा सभागृहात धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कादर तांबोळी, गटनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेविका संगीता मेनकुदळे, मंगलताई शेळवणे, रिझवाना शेख, ख्वॉजाबी पठाण, विजया खोगरे, अरुणा परांजपे, सौ.सोनवणे, सौ.शैलजा सोडळ, माया माने, नगरसेवक मुन्ना शेटे, रमेश पाटील, दगडूनाना मांगडे, बप्पा कसबे, शमशोद्दीन केमकर, संदीप बारंगुळे, उपमुख्याधिकारी डॉ.पवन म्हेत्रे, डॉ.विजय गोदेपुरे, प्रशा.अधिकारी शरद कुलकर्णी, दिलीप नान्नजकर, गणेश कारकर, सुनिता बुगडे, ज्योती कदम, संतोष कोल्हे आदी उपस्थित होते.
    यावेळी महिला बचत गटांना फिरता निधी, स्वयंरोजगार लाभार्थ्यांना अनुदान, शिवणकला व संगणक प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यात २५ महिलांसाठी रु.८६ हजार खर्चून प्रशिक्षण देण्यात आले. विविध भागातील ७ बचतगटांच्या ३७ लाभार्थ्यांना ७४ हजारांचा फिरता निधी, दारिद्रय रेषेखालील ११ लाभार्थ्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी बँकामार्फत २५ टक्के अनुदानाचे ११ लाखांचे कर्ज देण्यात आले आहे.
 
Top