उस्मानाबाद :- मुख्याध्यापकांनी मुलींसाठी शालेय स्तरावर आहारविषयक योग्य मार्गदर्शन व लोहयुक्त गोळ्या घेण्याविषयी नियोजन करुन  8 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत महिला दिन व जागतिक आरोग्य दिन आरोग्यमास म्हणून विविध आरोग्य विषयक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.कमलादेवी आवटे यांनी केले आहे.
        किशोरी उत्कर्ष मंच या उपक्रमातर्गत जिलह्यातील  जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता 9 वी ते इयत्ता 10 वीच्या मुलींचे हिमोग्लोबीन व रक्तगटाची  तपासणीचा महत्वाकांक्षी मोहिम आरोग्यकांक्षिणी या नावाने घेण्यात आली होती. सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्ताने हा उपक्रम जिल्हयात राबविण्यात आला. त्यात 2 हजार 808 मुलींची हिमोग्लोबीन व रक्तगटाची तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबीन प्रमाण 11 ते 13 ग्राम टक्के असणे आवश्यक आहे. तपासणी मोहिमेत 11 ते 12 किंवा 12 ग्रामपेक्षा जास्त हिमोग्लाबीन असणा-या मुलींचे प्रमाण केवळ 34.13 टक्के असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच 65.87 टक्के मुलींची हिमोग्लोबीनची स्थिती चिंजाजनक असल्याचे दिसून आले आहे.
 
Top