तुळजापूर :- कर्ज बोजाची 8 अ वर नोंद घेण्यासाठी 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शेकापूर (ता. उस्मानाबाद) येथील ग्रामसेवक संजय देवकते यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवार दि. 7 मार्च रोजी उस्मानाबाद येथील गणेश हॉटेलमध्ये करण्यात आली.
राजेंद्र खोतकर यांनी हॉटेल व्यवसायासाठी जय तुळजाभवानी अर्बन बँकेकडून सहा लाख रुपयांचे कर्ज मिळावे, यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. बँकेने त्यांचा हा प्रस्ताव मंजूर केला. तसेच त्यासाठी शेकापूर येथील घर व जागेवर कर्जाच्या बोजाची नोंद करून 8 अ सादर करण्यास सांगितले. त्यानुसार खोतकर यांनी कर्जाचा बोजा नोंद करून 8 अ देण्याची विनंती ग्रामसेवक देवकते यांच्याकडे केली. देवकते यांनी 6 मार्च रोजी खोतकर यांच्या हॉटेलवर गेल्यानंतर एक हजार रुपयांची मागणी केली. यावेळी खोतकर यांनी ग्रामसेवकांना 500 रुपये दिले, व उर्वरित 500 रुपये शुक्रवार दि. 7 मार्च रोजी शेकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आणून देण्यास सांगितले. त्यानंतर खोतकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिस अधीक्षक संजय बावीस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक नईम हाश्मी, त्यांचे सहकारी अश्विनी भोसले, पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप भगत, पोलिस नाईक सुधीर डोरले, नितीन सुरवसे, राहुल नाइकवाडी, चालक राजाराम चिखलीकर आदींनी ही कारवाई केली आहे.