उस्मानाबाद :-  केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज दि. ८ मार्च रोजी जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौ-यावर येत आहेत.
    दि. 9 मार्च रोजी ना. शरद पवार यांच्‍या उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक तुळजाभवानी जिल्हा दूध संघासमोरील छायादीप लॉन्स येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, पाणीपुरवठामंत्री दिलीप सोपल, आमदार दिलीप देशमुख, आमदार बसवराज पाटील, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी खासदार डॉ. जनार्धन वाघमारे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शैलेश पाटील चाकूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले आहे.
 
Top