उस्‍मानाबाद :- दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परिक्षेमध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग  येथील  परीक्षा केंद्रास भेट दिली असता दोन परिक्षार्थी  परिक्षेत गैरप्रकार करताना आढळून आल्याने  केंद्र संचालक  शेख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुमित गायकवाड आणि निखील पाटील अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
परीक्षक म्हणून काम पाहणारे शिक्षक एस. एम. नखाते आणि पी. ए. दासकर यांच्याविरुद्ध परिक्षक म्हणून योग्य रितीने जबाबदारीने कर्तव्य पार न पाडल्याने त्यांचेविरुध्द शिस्तभंग करण्याचे निर्देश माध्यमिक आश्रमशाळा संस्थेस देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके यांनी दिली. उर्वरीत ठिकाणी परिक्षा सुरळीत असल्याचे त्यांनी  सांगितले
 
Top