उस्मानाबाद :- मतदानाविषयी जागरुकता वाढावी आणि प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवार, दि. 8 मार्च रोजी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. 
     उस्‍मानाबाद येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही मानवी साखळी करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालये, यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी या मानवी साखळीत सहभागी होणार आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांच्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे. निवडणूक निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप-2 (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Top