उस्मानाबाद :- गर्भधारणापुर्व व प्रसवपुर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 अंतर्गत औरंगाबाद येथील विभागीय दक्षता पथकाने डॉ. अमोल जैन यांचे श्रध्दा डायग्नोस्टीक सेटर, काळामारुती मंदिर, उस्मानाबाद या  सोनाग्राफी केंद्राची  विभागीय तपासणी पथक व डॉ. डी. के. पाटील यांच्या संयुक्त  पथकामार्फत तपासणी  केली असता या तपासणीत सोनोग्राफी केंद्रामध्ये अनियमितता  आढळून आले आहे.
            पीसीपीएनडीटी कायदयानुसार सोनोग्राफी केंदाची मशीन शिल करुन  केंद्राची पंचनामा करण्यात आला. या केंद्राचे  सर्व रेकॉड, एम  रजिस्टर, संमतीपत्र, पाच कॉलमचे रजिस्टर, सोनोग्राफी मशिनचा प्रोब, नोंदणी प्रमाणपत्राच्या दोन्ही प्रती ताब्यात घेवून या केंद्रांची मान्यता कायम स्वरुपी रद्द करण्यात आले.  या केंद्राच्याविरोधात  न्यायालयीन प्रकरण दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांनी एका प्रध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.       
 
Top