पांगरी (गणेश गोडसे) :- 'शेतक-यांची लुट नेहमीचीच, नेहमीच येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणेच शेतक-यांना लुटण्‍याच्या घटनाही अतिशय नियोजनबदध होतात. उत्पादक शेतक-यांनाही ही घटना अंगवळणी पडु लागल्या असल्याचेच दिते. यापुर्वीच्या फसवणुक झालेल्या घटनांचे दाखले समोर असतानाही केवळ अवकाळी पावसाचा कालावधी सुरू असल्यामुळे शेतक-यांना स्वतः होऊन व्यापा-यांची घरे भरावी लागली आहेत. कांहीही करा पण द्राक्ष बागांमधील माल झटक्यात उचला या अटहासामुळेच व्यापा-यांने साधले असुन त्यांनीही या बाबींचा नियोजनबध्‍द फायदा उचलुन शेतक-यांना नेहमींच्या पध्‍दतीने टोप्या घालुन राज्यातुन पलायण केले. त्र पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी उलटुन गेल्यानंतर व पैसे व्यापा-याकडुन सहजासहजी मिळण्‍याची शक्यता कमी झाल्यानंतर कांही धाडशी शेतक-यांनी शुक्रवारी पोलिसात धाव देऊन झालेल्या फसवणुकीच्या प्रकाराबाबर वाच्यता केली. वीस दिवसानंतर का असेना फसवणुक झालेल्या शेतक-यांनी आपली व्यथा मांडुन मार्ग निघेल अशी आशा धरली आहे.
     बार्शी तालुक्यात फसवणुक केलेल्या व्यापा-यांनेच महाराष्ट्रातील इतर भागातही अशा पध्‍दतीने स्थानिकांना हाताशी धरून व अल्पशा पैशांचे आमिष दाखवुन त्यांच्याच बँक खात्याचा आधार घेऊन कोटयावधी रूपयांची माया गोळा करून पोबारा केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र हया घटना अनेक वर्षांपासुन महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात घडत असताना शेतकरी गप्प कसे असा प्रश्‍नही समोर येत आहे. फसवणुक झालेल्या शेतक-यांपैकी कांही शेतक-यांना या ठकांच्या टोळीच्या म्होरक्याने मुंबई येथील एका मोठया बँकेच्या खात्याचा धनादेश दिला होता. मात्र धनादेश घेतलेल्या शेतक-यांने संबंधीत बँकेच्या बार्शीतील शाखेशी संपर्क साधुन खात्री केली असता खात्यात रक्कमच शिल्लक नसल्याचे व आपली फसवणुक झाल्यांचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली आहे.
    द्राक्ष बागा वर्षभर सांभाळताना पैसै द्राक्षे काढुन व्यापा-यांना भरूण देताना पैसै व आता द्राक्षांपोटी दिलेला धनादेश वठत नसल्यामुळे पुन्हा कोर्ट कचेरी करण्‍यासाठीही शेतक-यांचे पैसै अशा दुहेरी अडचणीत द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडलेला आहे. एका शेतक-यांना धनादेश मिळाला तोही न वठणा-या खात्याचा मात्र इतर शेतक-यांचे काय ज्यांनी धनादेश अथवा कशाचीच पर्वा न करता व्यापा-यांच्या घशात वर्षभर सांभाळलेली द्राक्षे घातली. आता त्यांना आधार कोणाचा, दाद कोणाकडे मागायची, त्यांनी दाद मागितल्यास त्यांना न्याय मिळुन व्यापा-यांनी लुटुन नेलेले ते शेतक-यांना परत करणार का? हे अनेक प्रश्‍न सध्या सदर शेतक-यांच्या अवतीभोवती घोंगावत आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना सापडणार का? हे येणारा काळच सांगणार आहे. सध्या तरी हा द्राक्ष उत्पादक शेतकरी उन्हाळयात सर्वस्व गमावलेल्या झाडाप्रमाणे उघडयावर पडला आहे. तसेच इज्जतीला भिऊन कांही शेतकरी एवढे घडुनही पुढे येण्‍यास कचरत आहेत. फसवणुक झालेले शेतकरी नेमके किती असतील याचा अंदाज अद्याप लागलेला नसुन फसवणुक झालेल्या शेतक-यांनी त्यांच्या हदीतील पोलिस ठाण्यांशी संपर्क करून गुन्हेगारांविरूदध गुन्हे दाखल करण्‍याची प्रक्रिया करणे गरजेचे असुन किमान शेतक-यांच्या संघटीत रेटयामुळे तरी शेतक-यांना टोप्या घातलेल्या व समाजात उजळमाथ्याने फिरणा-या ठकसेनांच्या मुसक्या आवळल्या जातील.
    काहीही झाले की त्याची जास्त हानी ही शेतक-यांनाच पोचते. मग गारपीठ असो दर गडगडन्याचा विषय असो फसवणुक कोणत्याही गोष्‍टीत जास्त फटका हा बळीराजालाच बसतो. मात्र तो हे सर्व सहन करत चुपचाप पुढे चालत राहतो. पण या शेतक-यांवरील संकटांचा मग ते मानवनिर्मित असो की नैसर्गिक विचार कोणीच करताना दिसत नाही. याचा विचार होणे गरजेचे आहे.
 
Top