उस्मानाबाद -: कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या रुईभर फिल्टर हाऊसचे कंपाऊंड व बी.एस.एन.एल. वॉल कंपाऊंडवर महाशिवरॅलीच्या जाहिरातीचे पेंन्टींग करणा-यांनी पेंन्टींग करुन सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याने उस्मानाबाद लोकसभा निवडणूक आचार संहिता, पथक प्रमुख तथा नगर अभियंता दिनेश व्यंकटेश शास्त्री यांनी पोलीस स्टेशन, उस्मानाबाद शहर येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.