चेन्नई -: इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) सातव्या हंगामातील पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) रंगणार असून तिथे २० सामने होतील. १६ ते ३० एप्रिल २०१४ या कालावधीत होणा-या लेगमधील सलामीची लढत गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अबुधाबीत रंगेल. या टप्प्यात प्रत्येक फ्रँचायझी संघ प्रत्येकी पाच सामने खेळेल.
आयपीएल गव्हर्निग कौन्सिलची बुधवारी चैन्नईत बैठक झाली. त्यानंतर सातव्या मोसमातील पहिल्या टप्प्याच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. सातव्या हंगामाचा उद्घाटन सोहळा १५ एप्रिलला अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर होईल. या स्टेडियमसह शारजा क्रिकेट स्टेडियम आणि दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. प्रत्येक फ्रँचायझीला तिन्ही ठिकाणी किमान एक सामना खेळणे, बंधनकारक आहे. अबुधाबी आणि दुबईत प्रत्येकी सात तसेच शारजात सहा सामने होतील.
पहिल्या टप्प्यातील १५ दिवसांपैकी पाच दिवस प्रत्येकी दोन सामने होतील. त्यात दोन ‘वीकेंड’चा समावेश आहे. दिवसातील पहिली लढत सायंकाळी चार वाजता तसेच दुसरी लढत रात्री आठ वाजता होईल. दिवसात एकच लढत असल्यास ती रात्री खेळवली जाईल. आयपीएलचा दुसरा टप्पा (एक ते १२ मे) शक्य झाल्यास भारतात किंवा बांगलादेशात होईल. तिसरा आणि अंतिम टप्पा (१६ मे ते एक जून) भारतात होईल. सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल पुन्हा एकदा परदेशात खेळवावी लागत आहे. .
यूएई मध्ये होणा-या सामन्यांचे वेळापत्रक
16 एप्रिल, 8 PM - मुंबई विरुद्ध कोलकाता
17 एप्रिल, 8 PM - दिल्ली विरुद्ध बंगळुरु
18 एप्रिल, 4 PM - चेन्नई विरुद्ध पंजाब
18 एप्रिल, 8 PM - हैदराबाद विरुद्ध राजस्थान
19 एप्रिल, 4 PM - बंगळुरु विरुद्ध मुंबई
19 एप्रिल, 8 PM - कोलकाता विरुद्ध दिल्ली
20 एप्रिल, 8 PM - राजस्थान विरुद्ध पंजाब
21 एप्रिल, 8 PM - चेन्नई विरुद्ध दिल्ली
22 एप्रिल, 8 PM - पंजाब विरुद्ध हैदराबाद
23 एप्रिल, 8 PM - राजस्थान विरुद्ध चेन्नई
24 एप्रिल, 8 PM - बंगळुरु विरुद्ध कोलकाता
25 एप्रिल, 4 PM - हैदराबाद विरुद्ध दिल्ली
25 एप्रिल, 8 PM - चेन्नई विरुद्ध मुंबई
26 एप्रिल, 4 PM - राजस्थान विरुद्ध बंगळुरु
26 एप्रिल, 8 PM - पंजाब विरुद्ध कोलकाता
27 एप्रिल, 4 PM - दिल्ली विरुद्ध मुंबई
27 एप्रिल, 8 PM - हैदराबाद विरुद्ध चेन्नई
28 एप्रिल, 8 PM - बंगळुरु विरुद्ध पंजाब
29 एप्रिल, 8 PM - कोलकाता विरुद्ध राजस्थान
30 एप्रिल, 8 PM - मुंबई विरुद्ध हैदराबाद