उस्मानाबाद -: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2014 चे अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, फिरते पथक, स्थायी निगराणी पथक यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 अन्वये पोटकलम 129,133,143 व 144 अनुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी नुसार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद यांनी आदेश जारी केले आहेत.
    सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तुळजापूर हे निवडणूकीच्या संपूर्ण कालावधीकरीता, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा व परंडा यांनी शिफारस केलेले व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मान्यता दिलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना नेमलेल्या कार्यक्षत्रात 17 एप्रिल,2014 रोजी तर फिरते पथक प्रमुख आणि सर्व स्थायी निगराणी पथक प्रमुख यांना नेमलेल्या कार्यक्षत्रात 19 मार्च ते 17 एप्रिल,2014 पर्यंत  नेमलेल्या कार्यक्षेत्रात अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. उपरोक्त आदेश नेमून दिलेल्या कालावधीसाठीच मर्यादित राहतील.
 
Top