उस्मानाबाद :- प्रत्येक अधिकारी, कर्मचारी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक व अंगणवाडी कार्यकर्तीनी दररोजचे काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात पारीजात कन्संल्टंसी, औरंगाबाद यांच्यावतीने सर्व अधिकारी कर्मचारी,अंगणवाडी कार्यकर्ती यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. नारनवरे बोलत होते.
अंगणवाडीच्या कामात सुधारणा करुन आपल्या जिल्ह्याला आय. एस. ओ. दर्जा प्राप्त करण्यासाठी कार्यरत राहण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे त्यांनी प्रतिपादन केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी. के. नवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवले यांनी आय. एस. ओ. प्रणालीबाबत रणनीती व सविस्तर मार्गदर्शन केले. पारीजात कन्संल्टंसी, औरंगाबादचे मुख्य परिक्षक प्रशांत जोशी यांनी उपस्थितांना करुन सखोल माहिती दिली. शेवटी उमरगा तालुक्याचे बालविकास अधिकारी चकोर यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी शहापूरकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जेवळीकर, मुरुमचे प्रकल्प विस्तार अधिकारी सोमवंशी, लोहारा प्रकल्प विस्तार अधिकारी वंजारवाडकर यानी परिश्रम घेतले.