कळंब :- पाथर्डी शिवारात असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍याच्या पायथ्याशेजारील वाळूचा उपसा केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील  चौघा विरूध्द कळंब पोलिस ठाण्यात सोमवार दि. १७ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
       पाथर्डी शिवारातील कोल्हापुरी बंधार्‍याच्या पायथ्याजवळ मधुकर प्रभू घुले रा.पाथर्डी, नवनाथ बाबूराव चौधरी रा. आडसूळवाडी,आत्मलिंग उत्रेश्‍वर फाटक रा.आथर्डी, रामभाऊ तात्याबा तांबडे रा.पिंपळगाव (को) यांनी मोठे खड्डे करून वाळूचा उपसा करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी मंडळ अधिकारी पंढरी श्रीपती आवटे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघाविरूध्द कळंब पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
Top