उस्मानाबाद :- निवडणुकीत प्रचारासाठी अनेक उमेदवार अथवा राजकीय पक्ष केबल, विविध वृत्तवाहिन्या, इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहिरात करतात. मात्र, ही जाहिरात प्रसारणापूर्वी ती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील माध्यम प्रमाणीकरण समितीकडून तपासून घेणे बंधनकारक राहणार आहे. विना परवानगी जाहिरातीचे प्रसारण हा आचारसंहितेचा भंग मानला जाईल असे निवडणूकविषयक माध्यम प्रमाणीकरण समितीने म्हटले आहे.
उमेदवार अथवा राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिरातीचा मजकूर तपासूनच तो प्रसारणयोग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच संबंधित जाहिरात उमेदवार अथवा राजकीय पक्षांना प्रसारित करण्यात येणार आहे. अर्थात यासाठी उमेदवारांना सदर जाहिरातीच्या दोन सीडी अथवा डीव्हीडीसह आणि त्यातील मजकूरासह विहित नमुन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील मीडिया कक्षाकडे (प्रसारमाध्यम कक्ष) सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे सदर जाहिरात प्रसारण योग्य आहे किंवा नाही, याची पाहणी करुन प्रमाणित करतील. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच उमेदवार अथवा राजकीय पक्ष सदर जाहिरात प्रसारित करु शकतील. याबाबत जिल्ह्यातील केबलचालकांनीही विनापरवानगी असलेली कोणतीही जाहिरात प्रसारणासाठी स्वीकारु नये अथवा त्याचे प्रसारण करु नये, असेही बजावण्यात आले आहे.
सदर विहित नमुन्यात अर्ज भरताना अर्जदाराचे नाव, सदर जाहिरात कोणाकडून देण्यात आली (जसे की, राजकीय पक्ष, समूह, संस्था, संघटना, ट्रस्ट आदी), राष्ट्रीय पक्ष की राज्यस्तरीय, पक्ष अथवा संबंधितांच्या मुख्यालयाचा पत्ता, कोणत्या चॅनेल अथवा केबलवर सदर जाहिरात प्रसारित केली जाणार आहे, उमेदवारांच्या फायद्यासाठी आहे का, असेल तर उमेदवारांचा पूर्ण पत्ता, जाहिरात प्रमाणीकरणासाठी देण्याची तारीख, जाहिरातीची भाषा, जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मिती खर्च, जाहिरात प्रसारणासाठीचा खर्च, एकूण खर्च आदी माहिती या अर्जासोबत यावेळी द्यावी लागणार आहे.
कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी विनापरवानगी जाहिरात प्रसारण करु नये असे आवाहन माध्यम प्रमाणीकरण समितीने केले आहे.