कळंब -: स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालाय, द्वारकानगरी कळंब व यशवंतराव चव्हाण प्रेमी मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ठाणे येथील सिध्दीविनायक उद्योग समूहाचे संचालक संजय पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांचे कार्य समाजातील बहुजनापर्यंत पोहचवा, यशवंतरावांना वाचनाची खूप आवड होती. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती समाजात रुजवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज तांत्रिक कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष सत्यवान शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.एस. जाधव, कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, सिध्दीविनाय उद्योग समूहाचे संचालक संजय पाटील, पुणे येथील उद्योजक अतुल पाटील, राजर्षी शाहू इन्स्टिट्युटचे प्राचार्य सत्येन शेळके, साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश गवळी, बनसारोळा गावाचे सरपंच युवराज काकडे, विद्याभवन हायस्कूल कळंबचे स्पर्धा परीक्षा प्रमुख खंदारे आदीजण उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा भूमीपूजन करण्यात आले. सिध्दीविनायक उद्योग समूहाकडून ग्रंथालयास यशवंतराव चव्हाण जीवन कार्यविषयक व स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके भेट देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सव्वाशे विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पहिली ते चौथी गटातून टेळे श्रावणी हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर कोकरे सुशांत द्वितीय, वैष्णवी रांदड तृतीय यांनी बक्षीसे पटकाविले. तर पाचवी ते आठवी गटातून कु. ठोंबरे ऋतुजा दिलीप प्रथम, शिंपले समृध्दी द्वितीय, मडके वैष्णवी तृतीय, चौधरी अमृता व चौधरी सुमित यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचलनायाचे अध्यक्ष सोनके जे.एस., प्रा. राजाभाऊ माळी, धनंजय गोरे, प्रा. टिप्परसे ए.डी., सदाशिव ढेंगळे, पांडुरंग गंभिरे, नितीन गोरे, भागवत गोरे, प्रतिक कुपकर, सुंदर जाधव, दिलीप ठोंबरे, शरद सुर्यवंशी, दगडू सोनके, थोरात समाधान, कदम लिंबाजी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गोंदकर यांनी केले तर आभार टी.जी. गोरे यांनी मानले.