बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) -: राजीव गांधी आरोग्य योजनेसाठी शासनाचा निधी मिळविणार्‍या बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये योजनेचा बोजवारा उडाला शासनाचा निधी मिळवून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मात्र त्याचा कसलाही फायदा होत नाही, रुग्णाच्या नातेवाईकांकडूनही रक्कम घेण्यात येत असल्याने शासनाला आणि नागरिकांचीही फसवूणक होत असल्याचे दिसून येत आहे. 
    मधूकर बब्रुवान पिसाळ (वय ५५) या शेतकर्‍याने गारपीठ व शेतीच्या नुकसानीमुळे मद्यासह करुन शेतातील पिकासाठी असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्य खाद असलेल्या एग्रोमिन हे औषध प्राषण केले, सदरच्या रुग्णाला जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरच्या रुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी पॅरालिसीस असल्याचे सांगीतले, त्याच रुग्णासाठी त्याच डॉक्टरांनी सायंकाळी किडनी फेल झाल्याचे सांगीतले तर दुसर्‍या दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून डॉक्टरांच्या शिक्षणाविषयी नातेवाईकांना शंका येत आहे. सदरच्या रुग्णाचे रिपोर्ट वेगवेगळे असल्याचे तसेच हा रुग्ण योजनेचा लाभार्थी असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांच्या उपचारात बदल झाला. सदरच्या रुग्णाकडे लक्ष देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली यामुळे वैद्यकिय क्षेत्रातील बार्शीचे नाव हे जगदाळे मामा रुग्णालयातूनच खराब होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
     दारिद्रय रेषेखालील व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या राजीव गांधी आरोग्य योजना सुरु करण्यात आली. याकरिता रुग्णाच्या शिधापत्रिका ओळखपत्र आदी पूर्तता केल्यानंतर लाभार्थ्यांच्या बीलाची रितसर रक्कम शासनाकडे प्रस्ताव पाठवून वर्ग करण्यात येते व त्याचा परतावा शासन संबंधीत रुग्णालयांना देते. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मात्र रुग्णांना तहसिलदारांचे पत्र आण, हा रोग आमच्या योजनेत येत नाही असे उत्तर दिले जाते. मोतीबिंदू, फाईल, फिशर, स्त्रीयांचे आजार, बाळंतपण, कुटूंबनियोजन, हृदयरोगाचा झटका, पांढर्‍या पेशी कमी होणे, मेंदूचा मलेरिया, डेंगू या रोगाची उपचार करण्यासाठी आमच्याकडे सुविधा नाही, तसेच तुम्ही रुग्णालयात पेशंट ऍडमीट करण्यापूर्वी का सांगीतले नाही, २४ तासानंतर आम्ही या योजनेचा लाभ देऊ शकत नाही. ७ दिवसांचा उपचार करता येईल त्यापुढे आम्ही इलाज करत नाही, कोणत्या रोगासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये सोय आहे याचे आम्ही सांगू शकत नाही. त्या सर्व रोगांची यादी आमच्याकडे उपलब्ध नाही, तुम्हाला गरज असल्यास इंटरनेटवरुन घ्या परंतु आमच्याकडे चार पाच पध्दतीच्या रोगावरच इलाज करु शकतो अशी माहिती जगदाळे मामा हॉस्पिटलमधील राजीव गांधी आरोग्य विभागाचे प्रमुख यू.एन. बोराडे यांनी दिली.
    कोणत्या तरी राजकिय पुढार्‍यांची ओळख आणा त्यांनी फोन केल्यावर विचार करु, दारिद्रय रेषेखालील नवीन यादी, जुनी यादी पैकी आम्ही एकच स्विकारतो आम्हाला त्या यादीतील नागरिकांसाठी परवानगी नाही या सारख्या अनेक प्रकारच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना वेळोवेळी सांगीतले आहे की आमच्याकडे येण्याची गरज नाही तशा प्रकारच्या शिधापत्रिका पाहून त्यांच्यावर इलाज करता येतात व तसे शासनाच्या आदेशाचे पत्रही सर्व रुग्णालयांना दिले आहे. परंतु हॉस्पिटलमधून वारंवार तहसिलदारांकडे लेखी पत्राची मागणी करण्यात येते. सध्या तहसिलदार व त्यांचे इतर कर्मचारी हे निवडणुकींच्या कामासाठी व्यस्त असल्याने अनेक रुग्णांना नाहक त्रास देण्यासाठी तहसिलदारांचे पत्र आणा असे ठणकावले जाते तर तहलिदार हे फोन उचलण्याच्याही मुडमध्ये नाहीत. त्यांनी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो, तोपर्यंत सोबत आणलेला रुग्ण हा बरा होतो अथवा त्याची परिस्थिती अत्यंत खालावलेली असते व अशा मरणासन्न अवस्थेतील रुग्णाच्या नातेवाईकांना पुढार्‍यांचे उंबरठे झिजविण्यासाठी कसलाही वेळ नसतो त्यामुळे नाईलाजास्तव मिळेल ते दागीने कमी दरात मोडून दवाखान्याच्या मृत्यूच्या सापळ्यात अडकलेला हात सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. दागिने कोणाकडे मोडायचे अथवा आम्ही ते विकत घेतो अशा प्रकारच्या दलालांचा विळखाही रुग्णालयाच्या आवारात दिसून येतो. काही संबंधीतांना योजनेत बसत नसले तरी या योजनेचा लाभ मिळवून दिला जातो, अनेकांच्या शिधापत्रिकांचे चित्रण करुन परत दिले जाते व परत देऊन वरिष्ठांना विचारना केली आहे परंतु लाभ मिळू शकत नसल्याचे सांगण्यात येते. त्या रुग्णांकडून बील अदा करण्यात येते व त्याच्या पश्‍चात तो रुग्ण दवाखान्यात उपचार घेत असल्याचे भासवून योजनेचा लाभ घेण्यात येतो आणि येणारी सवलत संबंधीतामध्ये वाटप केला जातो याचीही चौकशी करावी असे काही रुग्णांनी यावेळी सांगितले.
 
Top