उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने रमेशकुमार मकाडिया यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मकाडिया हे गुजरात राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव आहेत. 
    मकाडिया मंगळवारी उस्मानाबाद येथे येत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एस.एम.मुकणे यांची श्री.मकाडिया यांचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.मकाडिया यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह,शिंगोली (वेरळ कक्ष) येथे असणार आहे.
    नागरिकांना निवडणूक निरीक्षक श्री. मकाडिया यांच्याशी संपर्क साधावयाचा असेल त्यांनी लँडलाईन क्रमांक 02472-229572 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 7588190300 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.    
 
Top