उस्मानाबाद -: नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचा उस्मानाबाद येथील पहिलाच लोकशाही दिन... प्रशासनावर कडक वचक असणारे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख. कदाचित अल्पवधीतच ही ख्याती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली. त्यामुळेच सोमवारी, लोकशाही दिनी आपल्या तक्रारी घेऊन येणा-या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहाबाहेर होती.
अर्थात, लोकशाही दिनाशी निगडीत सर्व अधिकारीही वेळी उपस्थित होते. एकेक नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येत होते. तक्रार समजावून घेत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे संबंधितांना त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठीची प्रक्रिया समजावून सांगत होते. भूसंपादन केलंय , शेतातून जायला रस्ता नाही, साहेब, शेजारी मारहाण करतात...अशा एक ना अनेक तक्रारी. या तक्रारी खरंतर लोकशाही दिनाशी संबंधित नव्हत्या. तरीही, एवढ्या दूरवरुन येणाऱ्या नागरिकांची डॉ. नारनवरे यांनी निराशा केली नाही. प्रत्येकाची तक्रार आस्थेवाईकपणे एकून घेतली. काही प्रकरणात तर संबंधित नागरिकांना सुरुवातीला अर्ज द्या.. तहसीलदारांकडे तक्रार करा.. त्यांनी ऐकले नाही तर प्रांतसाहेबांकडे जा. तुमचा हा अर्ज मी त्यांच्याकडे पाठवतो. तुम्ही पाठपुरावा करा, असा सल्ला दिला.
न्यायालयीन प्रकरणे लोकशाही दिनात मांडली जात नाहीत, तुम्ही न्यायालयाचा निर्णय घेऊन या. आपण त्याप्रमाणे करु, असे त्यांनी एका नागरिकाला सांगितले.
सर्व अधिकारी आणि विभागप्रमुखांनाही त्यांनी लोकशाही दिनातील तक्रारींची विहित मुदतीत दखल घेण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही तक्रार असो, त्याची दखल घ्या, असे निर्देशही त्यांनी दिले.